नमस्कार
मी सई
बने. आजपासून आपल्याला या प्लॅनेट
सई या ब्लॉगवर भेटणार आहे. आयुष्यात
अनेक गोष्टी घडतात. कधी त्या सुखावणा-या
असतात तर कधी दुखावणा-या असतात. कधी आजन्म
खपली निघेल अशी जखम देऊन जातात.....कधी आपला एखादा शब्द कुणाला तरी दुखवून
जातो. ही सल मनाला लागते....पण ते त्या
व्यक्तीसमोर मान्य करता येत नाही. कधी
एखादी जगाला न आवडणारी मालिका माझी आणि लेकाची फेव्हरेट होते...त्यातल्या आम्हाला
दिसलेल्या सकारात्मक गोष्टी इतरांनाही सांगाव्या वाटतात...कधी एखादी जाहिरात बघून
आपल्या आणि ती बनवणा-याच्याही डोक्यावर हात मारावा वाटतो. कधी भटकंतीमध्ये
एखादा माणूस,..ठिकाण...पदार्थ...मनाला भावतात....हे
सर्व लिहावसं वाटतं...मनाला काही भावतं कधी मनाची तगमग होते...ही तगमग शांत
होण्यासाठी लिहीतं व्हावं हा उपाय मला योग्य वाटला..त्यासाठी ब्लॉगची कल्पना
लेकाने पुढे केली....पण मुहूर्त ठरत नव्हता...पण माझी ब्लॉग मैत्रीण ललित छेडा
यांनी भर दिला...त्यांचाही ब्लॉग आहे...कथा लिहीतात त्या...त्यांच्या नोस्टस उपयोगी आल्या.
आता
या प्लॅनेट सई नावाबद्दल....सई म्हणजे मीच...आणि प्लॅनेट म्हणजे माझा लेक वरद...या
ब्लॉगिंग प्रकरणात टेक्नीकल बाजूचे काय वरदचे....वरदला खगोलशास्त्र
आवडते...त्यामुळे त्याच्या प्रत्येक गोष्टीचे नाव प्लॅनेट वगैरे असते....म्हणूनच प्लॅनेट
सई...
आता
सर्वात महत्त्वाचे आज १२ जानेवारी...अवघ्या महाराष्ट्राच्या मातेची जयंती. ...आज
जिजाऊ आईसाहेबांची जयंती. ..या मातेने आम्हाला आमचा देव दिला...जिजाऊ आईसाहेबांना
आणि शिवाजी महाराजांना नमस्कार करुन हा लेखनाचा नवीन प्रवास सुरु करतेय...
मंडळी, आपला सहभागही महत्त्वाचा आहे.
आपल्या प्रतिक्रिया...सूचना नक्की सांगा....
माथेरानच्या
लाल मातीत जागला शिवरायाचा इतिहास
माथेरानची
लाल माती आमच्या कुटुंबासाठी मोहिनी अस्रासारखी आहे. कधी अचानक सुट्टीची लॉटरी लागली....वरदचे
शेड्युल मोकळे झाले...असे काही सोयीचे कारण मिळाले की आम्ही तिघं आपापल्या बँगा
सांभाळत माथेरान गाठतो...माथेरानची माती ...माणसं आहेतच तशी लाघवी....त्यातच आमच्या
डोंबिवली पासून जवळ...आणि रायगड जिल्ह्यातले..त्यामुळे माझ्या अधिक
जिव्हाळ्याचे....
गेली
पाच ते सहा वर्ष आम्ही वर्षातून दोनवेळातरी येथे जातोच... दरवेळी गेलो तरी
प्रत्येक पॉईंट नव्याने बघतो... या लाल मातीच्या कोप-यात मनसोक्त भटकंती
करतो....पक्षी...त्यांचे आवाज...फुलपाखरं...दगडाचे प्रकार...गेल्या वेळी आलो
तेव्हा कशी रचना होती आता कशी झाली, याची
चर्चा....एको पॉईंट वरून आवाजाची स्पर्धा.....सनसेट पॉईंट वरुन सूर्य पार अस्त
झाला तरी त्या दिशेला निशब्द होत बघत राहणं.... अंधारात रातकिड्यांच्या आवाजासोबत
काजवे मोजणं...कोणी नवखं भेटलं की आपणहून काय बघितलं याची चौकशी आणि हक्काने
पॉईंटची माहिती सांगणे......हा नेहमीचा कार्यक्रम.....इथल्या अनेक पायवाटा आम्ही
पालथ्या घातल्या आहेत...एकूण काय आम्ही माथेरान लव्हर्स आहोत...या लाल मातीची ओढ
आगळी आहे. या ओढीमध्ये आता अधिक वाढ झाली
आहे ती आपल्या महाराजांच्या इतिहासामुळे.....
समिर बांदेकर या शिवभक्तांने शिवस्मारकाची उभारणी केली आहे. एको पॉईंटच्या सुरवातीला असलेल्या बंगल्यामध्ये
उभे राहिलेले हे स्मारक भगव्या झेंड्याने सजलेले आहे. हा भगवा रंग आता माथेरानच्या पर्यटनस्थळांत उठून
दिसतोय.
माथेरानचा
एको पॉईंट प्रसिद्ध आहे. पहिल्यांदा
गेलेला पर्यटक असो की आमच्यासारखे नित्त्याचे....एको पॉईंटला भेट दिल्याशिवाय
माथेरानची सफर पूर्ण होत नाही. याच एको
पॉईंच्या अगदी सुरवातीला एका बंगल्याचे रुपांतर शिवाजी महाराज संग्रहालयात करण्यात
आले आहे. खरं तर माथेरानच्या लाल मातीत
भगवा झेंडा उठून दिसतो. पण हाच भगवा
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ असेल तर त्याचा डौल न्यारा असतो. हा भगव्याचा डौल आणि महाराजांचा अजोड इतिहास
बघायचा असेल तर या संग्रहालयाला नक्की भेट द्यायला हवी.
मुंबईमध्ये
राहणा-या समिर बांदेकर या गृहस्थाने हे संग्रहालय उभे केले आहे. इंग्रजी माध्यमामध्ये शिकलेली सध्याची पिढी....
अभ्यासापूरता महाराजांचा इतिहास वाचला जातो.
अशावेळी या पिढीला शिवाजी महाराज म्हणजे नेमकं काय...त्यांचं आणि आपलं नात
म्हणजे काय....द-याखो-यात,
मावळ्यांना सोबत घेऊन या राजाने किती
मोठं कार्य केलं....भल्याभल्या शत्रूंना कसं पाणी पाजलं....या राजाची
दूरदृष्टी.... कावेबाज म्हणून ओळखल्या जाणा-या इंग्रजी व्यापा-यांना महाराजांनी
कसं वढणीवर आणलं....त्यांची युद्धनिती...
.
....समयसूचकता....अशा एक ना दोन गोष्टी राजांच्या बाबतीत सांगता येतात. या फक्त कथा नाहीत...तर हे वास्तव आहे. आपल्या राजाचा हे शौर्य असेच सदैव जागते राहून तो येणा-या प्रत्येक पिढीने गौरवाने पाहावे....त्याचा अभ्यास करावा...आणि राजांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवावा.....हा हेतू समोर ठेऊन समिर बांदेकर यांनी या संग्रहालयाची निर्मिती केली आहे.

खरं
तर माथेरानसारख्या ठिकाणी मालकीची वास्तू असणे स्टेटसची गोष्ट...आणि ही वास्तू एको
पॉईंटच्या दर्शनी भागावर असेल तर क्या बात है...पण या बांदेकरांनी या आपल्या
मालकीच्या वास्तूमध्येच शिवाजी महाराजांचे संग्रहालय उभे केले आहे. संग्रहालयाची कल्पना त्यांच्या मनात आल्यावर
त्यांनी कोल्हापूर पासून राजस्थानपर्यंत अनेक दौरे केले. गावागावातून फिरुन महाराजांच्या समकालीन शस्र
मिळतील का याचा शोध घेतला. त्यांच्या
इतिहासात उल्लेख केलेली शस्र बनवून घेतली.
नाशिकच्या संदिप लोंढे या गृहस्थाला त्यांची ही कल्पना भावली...त्यांनी
बांदेकरांना शिल्पचित्र बनवून दिली.
महाराजांच्या आयुष्यातील ठळक प्रसंग...त्यांचे शिल्पचित्र...आणि त्या प्रसंगाची
संक्षिप्त माहिती असे स्वरुप ठेवले...भाले..तलवारी...वाघनखं...चिलखतं...अशा
महाराजांनी वापरलेल्या शस्रांचे इथे प्रतिरुप पहायला मिळते. मोडी भाषेतील महाराजांनी लिहिलेली पत्र
बांदेकरांना कोल्हापूरला मिळाली. त्याचे फोटो आणि त्या पत्रांचा अनुवादही येथे
पहायला मिळतो. या संग्रहालयासाठी त्यांनी
महाराष्ट्र आणि राजस्थानही पालथा घातला आहे.
राजस्थानमध्ये त्यांना एका गावात इतिहासकालीन शस्रांची काळजी घेणारा गृहस्थ
भेटला. त्याच्याकडून मिळालेल्या
माहितीचाही त्यांना या संग्रहालय उभारणीमध्ये फायदा झाला. या संग्रहालयात बाल शिवाजी,
जिजाबाईंनी
त्यांच्यावर घडवलेले संस्कार, अफजलखान
वध, राज्यभिषेक अशा काही ठळक घटना अत्यंत
सुबकरित्या साकारलेल्या आहेत. प्रत्येक
कक्षाची विभागणी केलेली आहे.
पत्र...शिल्पचित्र..शस्रास्र...चिलखतं...यांची विभागणी केलेली आहे. शिवाय सर्व वस्तू पेटीबंद असूनही आपल्याला निट
पहाता येतात. तलवारींचे अनेक
प्रकार...खंडा..खंजीर..कट्यार...दांडपट्टा..फिरंगी...ढाल...त्यांचे
प्रकार...बिचवा..वाघनखं...जाळीचे चिलखत...अशी अनेक शस्र या संग्रहालयात आहेत. त्यासोबत त्याची माहितीही आहे. स्वच्छ जागा..भरपूर प्रकाश असल्यामुळे वरवर
संग्राहलय छोटे वाटत असले तरी भरपूर माहिती देणारे आहे. सुरवातीलाच शिवाजी महाराजांचा पुतळा आणि भगवे
झेंडे यामुळे वातावरणात चैतन्य जाणवते.
याच ठिकाणी संभाजी महाराजांचाही इतिहास जपण्याचा प्रयत्न हे बांदेकर करणार
आहेत.
एकूण
काय अवघ्या दहा रुपयांच्या प्रवेश शुल्क असलेले हे संग्रहालय प्रत्येकाने बघावे
असेच आहे. मी, माझा मुलगा आणि नवरा आम्ही तब्बल तीन तास इथे होतो.
मंडळी
तुम्हीही जेव्हा माथेरानला जाल तेव्हा शिवाजी महाराजांच्या या संग्रहालयाला नक्की
भेट द्या...
सई
बने
डोंबिवली
Congratulations !!! ...your first blog and that too on Shivaji Maharaj..superb ..khup Chan mahiti milali..all d best
ReplyDeleteCongratulations
ReplyDeleteAsach chhan mahiti Det ja
Excellent
Thanks..
DeletePls follow me
Very nice article. Congratulations madam.keep it up
DeleteAbhinandan ' tu lihit jave Ani amhi vachtach rahave . good job .& all d very best
ReplyDeleteThanks..
DeletePls follow me
खूप छान माहिती, धन्यवाद
ReplyDeleteधन्यवाद अमितजी
Deleteखूपच छान.लिहिण्याची कला जन्मजातच असते आणि ती तुझ्याकडे आहे.असेच कायम लिहीत जा.best luck
ReplyDeleteThanks..
DeletePls follow me
Congratulations.. khup chhan mahiti. Aata matheran la sangrahalay pahnya sathi nakki bhet dili pahije.
ReplyDeleteThanks Shradda
DeletePls follow me
अभिनंदन... खूप छान...
ReplyDeleteThanks..
DeletePls follow me
Abhinandan sai....khup cchan lihites tu he mahit hota pan tu suddha mazyasarkhich shivbhakta aahes yacha jast aanand aahe....all the best
ReplyDeleteThanks..
DeletePls follow me
खूप खूप अभिनंदन,खूपच छान लिहिलं आहे
ReplyDeleteThanks..
DeletePls follow me
Very nice and all the best
ReplyDeleteThanks..
DeletePls follow me
Very good,keep it up! Bravo Planet Sai😍
ReplyDeleteThanks..
DeletePls follow me
Beautiful beginning Sai! My best wishes for your new endeavour. Lalita Chheda is an inspiration to many and I am blessed to be an integral part of her family.
ReplyDeleteThanks nidhi
DeletePls follow me
अभिनंदन छान लिहिलंय
ReplyDeleteMadam...special thanks for u
Deleteअभिनंदन सई ! सुंदर मांडणी, माहिती व छायाचित्रे. असेच लिहीत रहा.
ReplyDeleteThanks..
DeletePls follow me
अभ्यासपूर्ण लेखन. अभिनंदन आणि शुभेच्छा !
ReplyDeleteThanks..
DeletePls follow me
छान
ReplyDeleteनवीन वर्षाची सुरुवात चांगली झाली. आता तुझं भावविश्व, मतं,निरीक्षण याला एक भक्कम प्लॅटफॉर्म मिळालाय. शुभेच्छा
Thanks..
DeletePls follow me
राजे नक्की सांगा
सई बने यांनी माथेरान येथील श्री समीर बांदेकर यांच्या शिव स्मारक संग्रहालयावरील लिहिलेला लेख सर्वाना प्रत्यक्ष जाऊन बघण्यास उधुक्त करील असा आहे.
ReplyDeleteसई बने यांचे अभिनंदन.
Thanks..
DeletePls follow me
फार सुरेख
ReplyDeleteThank You! 😊
Thanks..
DeletePls follow me
"छत्रपती शिवाजी महाराज,
ReplyDeleteसमस्त भारतीयांच्या मनातील आदरणीय श्रद्धास्थान 🙏"
आपण आपल्या ब्लॉग लेखनाची सुरुवात महाराजांच्या वरील लेखाने केल्याने सर्व प्रथम आपले अभिनंदन.
अतिशय नेटका व समर्पक लेख
धन्यवाद
विनायक कर्वे
Thanks..
DeletePls follow me
आपले अनुभव शेअर केल्या बद्दल धन्यवाद! अजून पर्यंत हे संग्रहालय पहाण्याचा योग आलेला नाही. बऱ्याच लोकांकडून ते बघण्यासारखं आहे असं कानावर आलंय तेव्हा नक्कीच पहायला जाणार.
ReplyDeleteतुमची लेखन शैली आवडली. छान लिहिता. नवीन सुरु केलेल्या ब्लॉग साठी अनेक शुभेच्छा आणि तुमचे अभिनंदन
पुष्कराजजी मनापासून धन्यवाद
DeletePls follow me
अापल्या उद्बोधक माहितीबद्दल अतिशय धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
ReplyDeleteजय महाराष्ट्र !!
प्रकाशजी धन्यवाद
DeletePls follow me
अभिनंदन शिल्पा अखेर वरदची सर्व कालजी घेत असतांना तुझ्यातील पत्रकार जीवंत ठेवलास. महाराजाबदल बांदेकरानी जे काही केल आहे त्याबद्दल तु लिखाण करून माहिती दिल्याबद्दल मनापासून आभार मी नक्कि माथेरानला जाऊन बघणार आहे
ReplyDeleteThanks..
DeletePls follow me
Firstly Congratulations for your blog Sai 💐I read the blog and it is so informative and beautifully written ⚘ please continue writing more blogs and also wishing you all the luck for the future 💐 Waiting for a new blog soon 💐 ~ Vaishnavi Vijay Kadam
ReplyDeleteThanks..
DeletePls follow me
I my self had seen this Museum A very great work done by Sameer Bandekar his dedication and hard work love FOR SHIVAJIMAHARAJ is behind this Museum and good article written my Name Madam.
ReplyDeleteThanks..
DeletePls follow me
I my self had seen this Museum A very great work done by Sameer Bandekar his dedication and hard work love FOR SHIVAJIMAHARAJ is behind this Museum and good article written my Bane Madam.
ReplyDeleteFrom shekShe Deshmukh.
DeleteThanks..
DeletePls follow me
congratulations... आम्ही नविन ब्लॉगची वाट पहात आहोत. keep writing
ReplyDeleteThanks..
DeletePls follow me
Congratulations.khup chhan suruvat.asech lihit raha
ReplyDeleteThanks..
DeletePls follow me
अभिनंदन , All the best and keep it up.
ReplyDeleteThanks..
DeletePls follow me
This comment has been removed by the author.
ReplyDeleteफारच छान माहिती, संग्रहालयाला अवश्य भेट देऊ,
ReplyDeleteब्लॉग साठी अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा!!
Thanks..
DeletePls follow me
This comment has been removed by the author.
ReplyDeleteVery nice information.
ReplyDeleteKeep it up. Congratulations 👍👍
Thanks..
DeletePls follow me
Very nice information.
ReplyDeleteKeep it up. Congratulations 👍👍
Thanks..
DeletePls follow me
धन्यवाद सई, तुझ्या डोळ्यांनी शिव संग्रहालय पहिलं.आता प्रत्यक्ष भेट देवून पुन: प्रत्ययाचा अनुभव घेवु.
ReplyDeleteधन्यवाद दादा
DeletePls follow me
Thanks..
ReplyDeletePls follow me
फारच छान
ReplyDeleteVery nice Saimam. Blog name planet sai is ultimate.
ReplyDelete