कांदे पिकवणा-या भावासाठी....
सकाळी वरदला बसपर्यंत सोडायचं आणि नंतर मॉर्निंग वॉक...हा नेहमीचा कार्यक्रम...या फे-यांच्या नावाने हक्कांच्या माणसांना भेटता येतं...बोलता येतं....आणि नवीन अनुभवही येतात.  दोन दिवसापूर्वी घराच्या कोप-यावरच कांदे विकायला एक टेंम्पो आलेला दिसला...सकाळी साडेसहाची वेळ...पुरेसं उजाडलेलं
ही नव्हतं... टेम्पोमध्ये पाच आणि दहा किलोच्या कांद्याच्या अनेक गोणी.... त्यासोबत किमान दहा माणसं....थंडी ब-यापैकी होती....नाशिकहून भल्या पहाटे निघालेली ही मंडळी गारठली होती....माझ्या घराजवळचा त्यांचा पहिलाच स्टॉप.... कांद्यांच्या काही गोणी आणि एक माणूस उतरवून गाडी पुढच्या स्टॉपला गेली...आमच्या कोप-यावर बहुधा सर्वच शाळांच्या बसेस येतात...त्यायोगे मुलांचे पालकही येतात.  त्यामुळे सक्काळ सक्काळ आम्हा पालकांचा मोर्चा त्या कांद्याकडे वळला...दहा रुपये किलो कांदा...पाच किलोची गोण पन्नास रुपये...दहा किलोची शंभर...साधा हिशोब...हातात तर पैसे नव्हते...त्या माणसाला थोड्यावेळात पैसे घेऊन येते असे सांगून मी निघाले....मात्र जमलेल्या अन्य गर्दीचा होशोब सुरु झाला.  हे काय...तो सांगतोय आणि तू हो म्हणतेस...(तो..म्हणजे बहुधा वयाची साठी ओलांडलेला...साधासा शेतकरी)...मला किलोला दहा रुपये ओकं वाटलं...पण काही मंडळींनी भाव सुरु केले....तिकडे  फेकतात रस्त्यावर आणि तुम्ही असा भाव सांगता...ऐंशी रुपये ठिक आहे...आम्ही बघा किती जण...एवढे संपतील ना तुमचे कांदे पटपट.... घासाघीस करायला सुरुवात...तो बिचार काका ओ ताई ऐकाना....नाही जमत हो...आमचं पण पोट आहे....पहाटे थंडीत निघतो....गाडी भाडं...पेट्रोल...काय..काय सांगत होता...पण त्याचा आवाज चालेना...त्यांना तसंच सोडून घरी आले. थोड्यावेळानं खाली आले तर गर्दी कमी झालेली...त्या काकांच्या जोडीला एक तरुण आलेला...बहुधा मगासचा ग्रुप या तरुणानंच हाताळला...मी दहा किलोची गोण घेतली... उजलायला भारी पडत होती...त्या मुलाला बिल्डींगच्या दारापर्यंत गोण ठेवायची विनंती केली...तो घरापर्यंत आला...मी थॅक्स म्हणून पाण्याचा ग्लास आणि लाडू त्याच्या हातावर ठेवला. पाणी
प्यायल्यावर मला त्यानं विचारलं, ताई भाव नाय केलात...मी फक्त हसले.  जगदीश नाव त्याचं..वीस वर्षाचा...अकरावी केली आणि घरी बसलाय. शेती आहे. पण नावाला.  दर वर्षी कांदा रडवतो. पण दुसरं पीक माहित नाही.  यावर्षीही तिच गत. आता घरचा, शेजारच्यांचा कांदा एकत्र करुन विकायला येतात..कुठे कुठे टेंम्पो उभे करायचे.  त्यासाठी मध्यरात्री घर सोडायचे. आईनं बाधून दिलेली भाकरी चहा किंवा वड्यासोबत खायची.  दिवसभर एका कोप-यावर बसायचे..फार घासाघीस न करता कांदा विकायचा...हाताशी फार काही येत नाही..त्यात टेम्पो भाड्याचा...टोलचे पैसे....जगदीश उभ्या उभ्याच सांगत होता.  निघतांना म्हणाला, शहरातल्या लोकांना सगळं पाहिजे पण शेत पिकवणारा नतो....कसंल बोलला तो...मन सुन्न झालं...
नंतर दुपारी, संध्याकाळी आणि रात्री नऊ वाजताही मी त्या कोप-यावर कामासाठी गेले. ही बापलेकाची जोडी होती. बाबा मुटकूळ करुन झोपलेला. जगदीश कानात इयरफोन टाकून काहीबाही ऐकत होता.  अजूनही चार पाच गोणी शिल्लक होत्या. जगदिशला विचारलं आज मुक्काम का...तेव्हा कळलं,  टेम्पो सगळयांना घेऊऩ येणार होता.  दहा वाजणार होते बहुधा...त्यानंतर घर..जमल्यास दुस-या किंवा तिस-या दिवशी, अन्य ठिकाणी पुन्हा असाच दौरा...तो बोलत होता, तितक्यात त्याचा टेम्पो आला...त्यात सकाळची माणसं आणि काही गोणी होत्या.  बाबा गुमान उठले...चार गोणी त्यात टाकून त्याच्यावर डोके ठेऊन थोडी जागा करुन बसले.  जगदीश, पंधरा दिवसांनी येतो ताई, म्हणत पुढच्या सिटवर बसला...
रात्री पुन्हा बातम्यांमध्ये कांद्याच्या भावाची बातमी होती. शेकत-यांचे आंदोलन..कांद्याचे भाव..शेतक-यांची होणारी होरपळ..मला ते बघतांना समोर जगदीश आणि त्याचे बाबा दिसत होते.


भाजीला गेल्यावर भाव करायचा नाही, आपल्याला परवडत नसेल तर घ्यायची, नाहीतर नाही.  हा माझा सरळढोक नियम...गेली वीस वर्षे मी आमच्या डोंबिवलीच्या प्रसिद्ध फडके रोडवर भाजी घेण्यासाठी जाते.  आसपासच्या गावावरुन विहिरीच्या पाण्यावर पिकवलेली भाजी घेऊन अनेक महिला या रोडवर सकाळी आठसाडेआठच्या सुमारास येतात..गावठी मेथी, कोथिंबीर, पालक, चवळी, लालमाठ, आळूची पानं, पातीचहा, भोपळ्यची फुलं, वांगी, कच्चे टॉमेटो, भेंडी, काकडी, शेवग्याच्या शेंगा अशा ताज्या भाज्या...कितीही कमी घ्यायच्या म्हटलं तरी मन भरत नाही अशा..शक्यतो सोमवारी सक्काळी फडके रोड गाठायचा, भाजी घ्यायची आणि त्यांच्या हातात शंभरच्या नोटा द्यायच्या...त्यातली एक एकमेकींना विचारुन हिशोब करते आणि उरलेले पैसे परत करते.  या थोड्या वेऴेत आमच्या गप्पा रंगतात...या महिलांचा दिवस सकाळी चारला सुरु होतो ते रात्री उशीरा संपतो.  मुळात भाजी संपवून घरी जायचं...घरातली कामं..भाज्यांच्या मळ्याची देखरेख....दुस-या दिवसासाठी भाज्या खुडणं...या महिला येतांना भाजी भाकरीचा डबा घेऊऩ येतात...संध्याकाळ होणार असेल तर दुपारी दुकानं बंद झाल्यावर पायरीवर डुलकी काढायची.    बाथरुमची व्यवस्था नाही. त्यामुळे पाणीच कमी प्यायचं...सार्वजनीक स्वच्छतागृहांमध्ये दिवसातून दोन वेळा गेलं तरी पुष्कळ. त्यात रस्त्यावर बसतात, म्हणून होणारा त्रास तर विचारु नका...पण असे असले तरी कधी तक्रार नाही.  त्रागा नाही.  या महिलांची नावं मला माहिती नाहीत...नाव न जाणतांही आमचं आपुलकीचं नातं झालं आहे...त्यात घासाघीस नाही...असंच काहीसं ठाण्याच्या बाजारात...ओले काजू सुरु झाले की ठाण्याची बाजारपेठ गाठायची...ओले काजू...ताडगाळे...सुरंगीचा गजरा...जमल्यास जाम आणि जांभळंही...आमचे फक्त चेहरे माहीत आहेत...गेल्यावर त्या महिलाही हक्कानं काही अधिक घ्यायला सांगतात...मी घेतेही...छान आहे...परत कधी येशील म्हणून चौकशी केली की बस...व्यवहारात घासाघीस नाही....
भाजी घेतांना काही पैशावरुन घासाघीस करणारे पाहिले की मला नेहमी प्रश्न पडतो, ही मंडळी हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावरही असेच करतात का...अहो पालक जुडी तर बाहेर दहा रुपयांना मिळते...मटार तर तीस रुपये किलो झालाय...टोमॅटो तर वीस रुपये किलो मिळतोय...कांदे किती स्वस्त आहेत...असे प्रश्न त्या मेनू कार्डवरील अव्वाच्या सव्वा दर बघून पडतात का...ब-याच वेळा नाही पडत...आणि ते पडले तरी विचारायची हिम्मत होत नाही...चार जणांचे हजार रुपयांच्या वर वीस पंचवीस रुपये असे बिल झाले आणि त्या मॅनेजरने कन्सशेनच्या नावाखाली ते कमी केले तरी फुक्कट जेवण जेवल्याचा आनंद होतो.  मध्यंतरी मैत्रिण मोठ्या पिझ्झाच्या दुकानात घेऊन गेली. मुळात त्या पावाबरोबर माझं जमत नाही.  त्यामुळे पावावर घातलेलं भरपूर चिज आणि चव येईल म्हणून चिलीफ्लेक्सची पाकीटं..(आमच्याकडे मसाला कुटायला दिल्यावर तो मसालेवाला आठवणीने त्या मिरचीच्या बीया पुडीत बांधून परत देतो...पोटाला त्रास नको म्हणून..आणि इथे चव येते म्हणे)..वरुन कॉफी घेतली तर ती पाणचट..आणि बील किती...बापरे सातशे रुपये...पटकनं कार्ड पेमेन्ट...कमी करा...चव नव्हती..वगैरे नाहीच...
किती तफावत आहे या विचारात..जिथे खरोखर भाव करायची गरज आहे तिथे आपण आपला भाव कमी होऊ नये म्हणून नको तेवढा खर्च करतो...आणि जिथे खरोखर मोकळा भाव ठेवायची गरज आहे तिथे आपण घासाघीस करत बसतो.  शेतक-याची अवस्था, शेतमालाचे भाव, दुष्काळाचे चक्र याबाबत मला सांगायचं नाही...प्रत्येकाच्या जाणीवा वेगळ्या असतात.  पण माणसाने माणसासारखे वागले तरी पुष्कळ....
सई बने
डोंबिवली



Comments

  1. Khup sunder manamanamadye manuski jagvnari

    ReplyDelete
  2. Khup chhan lekh. Asech apale vichar lihit raha.

    ReplyDelete
  3. अभिनंदन! खूप छान लेख आहे.

    ReplyDelete
  4. खुप सुंदर. मी ही या मताशी सहमत आहे व असेच अवलंबतो. सगळ्यांनी जमल्यास शेतकरी भाजीपाला विकत असेल तिथूनच विकत घ्यावा व कृपया भाव करून त्यांचा अपमान करू नका. ते जगतील तरच आपण जगू ही भावना मनात असू द्या. फरक नक्की पडेल.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद...शेतकरी आहे म्हणून आपण आहोत...

      Delete
  5. खरे आहे हे आपण रस्त्यावरच्या भाजीवाल्याकडे भाव केला की आपण खुप मोठा विजय मिळवून आलो असे मिरवणारे, पण कधी त्या गरीब शेतकऱ्यांच्या मेहनती कडे डोकावून पाहिले आहे का?

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद..खरं आहे...शेकत-याच्या मेहनती एवढा मोबदला त्याला मिळालाच पाहिजे..

      Delete
  6. I completely agree with your thoughts. Indeed I execute it in my own life too
    - from Sangeeta Rajan Mahadeshwar

    ReplyDelete
  7. अंत्यत चांगली मांडणी केली आहे विशेष करुन महिलांमध्ये शेतकऱ्यांच्या भावाबाबत घासाघिस न करण्याची जागरुकता करण्याची गरज आहे मुंबई च्या जवल डोंबिवली मध्ये राहुन काल्या मातीशी असलेले नांत खुप मनापासुन जंपल आहे आणि त्याच प्रामाणिकपणे मांडले आहे. टायपिंग काही किरकोळ चुकांकडे लक्ष्य द्यावे

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद...नक्कीच सर

      Delete
  8. Congratulations on your second blog ⚘⚘ I read and it is so relatable.We should give them the maximum amount they deserve because of their hard work and honesty as well as consistency.I also buy all the goods from them in shivaji park where farmer's weekly market is held.
    Vaishnavi .Vijay .Kadam

    ReplyDelete
  9. खूप छान लेखन

    ReplyDelete
  10. मनाला भिडणारा लेख.

    ReplyDelete
  11. Sai far microlevel la jaun dusarya vyakti vishai janun gheun tyla apan aplya pari ne Kay change karta yeil yaacha pratyksha anubhav.
    Sorry to say parantu striya Kiva apan generally bhajivalya kade gelyavar negotiate karto he matre khare aahe ki dmart Kiva big bazar yaa thikani jya kimitit aahe te khardi karto.
    Shetkaryani kanda chya utpadana barobar preservation tyach pramane allied products tayar Karun te bazarat vikri Keli pahije.
    Chan lekh and good observations.

    ReplyDelete

Post a Comment