संकोच आणि आरोग्य
काकू, हे कुठे वाळत घालू...अगदी हळू आवाजात, माझ्याकडे आलेल्या पाहुणीनं मला विचारलं...मी स्वयंपाकघरात...डब्याची तयारी करत होते...काय ग म्हणत तिला मोठ्यानं विचारलं...तर तिनं पुन्हा तसंच हळू आवाजात विचारलं...आणि ओढणीखाली लपलेले कपडे दाखवले...मी एकदा त्या कपड्यांकडे बघितलं आणि तिच्याकडे...अग बाहेर घाल ना...तर तिचा पुन्हा प्रश्न चालेल का...गॅलरीत वर घालू का एका कोप-यात....मला कळलच नाही...कशाला...वर चढतेस...तिथे खिडकीत असलेल्या हॅंगरवर घाल...उन येतं तिथे...सुकतील बघ...पण पुन्हा ती तिथेच उभी...हे पण तिथेच घालू का...आता काय परत परत तेच...म्हणत मी पुन्हा त्या कपड्यांकडे बघितलं...तर ती ब्रेसिअर दाखवत होती...अग घाल ना...त्यात काय होतं...एवढं कोण बघतंय...म्हणत मी तिला जरा दटावलं...पोरगी थोडी बावचळली...आणि मी सांगितलेल्या जागी कपडे वाळत घालून परत आली. गेल्या आठवड्यात आमची एक दूरची नातेवाईक मुलगी काही कारणासाठी आमच्या भागात येणार होती. ती आणि तिची आई...दोघीच होत्या...लांबचे नाते असले तरी तिच्या आईसोबत माझी चांगली गट्टी आहे...त्यामुळे येणार असाल तर आमच्या घरीच उतरा असा आग्रह त्या दोघींना केला आणि त्या आमच्या घरी आल्याही. सकाळी सहा वाजता त्यांची गाडी आली आणि त्या आमच्या घरी सकाळी साडेसहाच्या सुमारास दाखल झाल्या....गावाहून एसटीचा प्रवास...बारातासांचा...त्यामुळे या दोन्ही मायलेकींना आल्याआल्या आंघोळीसाठी पाठवलं...त्यातील लेकीची आंघोळ झाली आणि ती तिच्या कपड्यांचा प्रश्न घेऊन माझ्यासमोर उभी राहीली...तिला सांगून झाल्यावर तिच्या आईचाही तोच प्रश्न...मग तिला तिच्या मुलीनंच कपडे वाळवत लावायची जागा दाखवली...तिच्याही चेह-यावर तोच संकोच...मी थोड्यावेळानं बघितलं तर दोघीही मायलेकींनं एक ओढणीखाली आपली अंतरवस्त्र वाळवत ठेवली होती...मी काहीच बोलले नाही...सकाळची कामं...आलेल्या पाहुण्यांचा नाष्टा आणि नव-याची डब्याची घाई...त्यात हा विषय बाजुला पडला...नंतर बघू म्हणून मी बाकीच्या कामांना लागले...
महिला आणि त्यांची अंतरवस्त्र हा फारसा चर्चेचा विषय होतच नाही. आणि झाला तर त्याला अतीबोल्ड आहेत, असा शिक्का मारुन गप्प करण्यात येतं. माझ्याही लहानपणी अशीच अवस्था होती. आत घालण्याचे कपडे कुठेतरी कोप-यात वाळवायचे आणि गपचूप एक कोप-यात लपवल्यासारखे ठेवायचे...कोणालाही दिसले नाही पाहिजेत. अगदी ड्रेसमधून चुकून कधी ब्रेसिअरची पट्टी बाहेर आली तर आसपासचं कोणतरी डोळ्यानं खुणावणार....बाहेर आलंय बघ...मग जणू मोठी चोरीच केली की काय असा भाव चेह-यावर येणार...आणि ती पट्टी कोणी बघत नाही ना हे बघून आत ढकलली जाणार...ब-याचवेळा मग ड्रेस आणि त्या ब्रेसिअरच्या पट्ट्यांना पिना लावल्या जायच्या....का तर चूकूनही तिनं बाहेर डोकवायला नको...या लपवालपलवीत अनेक ड्रेस, पिना लावल्यामुळे फाटले आहेत. साडी नेसायला लागल्यावर ब्लाऊजच्या बाबतीतही अशीच रड...मुळात आपले कपडे...आपल्या शरीराच्या एखाद्या अवयवाच्या आकाराचे घातले तर ते लपवायचे कशाला हा मला पडणारा प्रश्न असायचा...पण तेव्हा विचारायची आणि बोलायची सोय नव्हती...पण जेव्हा हे कळायला लागलं...आणि व्यक्त होण्याची सवय लागली तेव्हापासून आतल्या कपड्यांची गरज आणि त्यांचे आरोग्य हे जाणता आले तेव्हा मात्र हा संकोच बाजूला ठेवला. आपल्या कपड्यांनाही ऊन्हाची गरज आहे, कडक उन्हात छान सुकलेले हे कपडे आरोग्यासाठी चांगले असतात याची जाणीव झाली आणि हा संकोच दूर झाला.
नाशिकमध्ये हॉस्टेलवर रहातांना या आरोग्यदायी वळणावर जास्त लवकर आले. तिथे सोबत अनेक वैद्यकीय शिक्षण घेणा-या मैत्रिणी होत्या. त्या नेहमी सांगायच्या बायकांना जास्त आजार त्यांच्या कपड्यांमधूनच होतो. आपण आपल्या शरीराला आवश्यक असे कपडे घालायला हवेतच पण त्यांची
काळजी जास्त घ्यायला हवी. तेव्हातर ही अंतरवस्त्र अगदी मोजकी असायची. मात्र आता काळ बदलला आहे, आणि तशी या कपड्यांमध्येही विविधता आली आहे. विविधता म्हणण्यापेक्षा सुलभता आली आहे. ब्रेसिअरच्या बाबतीच घ्या ना....कितीतरी प्रकार आले आहेत. वनपिसमध्ये घालण्यासाठी वेगळी, साडीसाठी वेगळी, डीपगळ्याच्या ब्लाऊजसाठी वेगळी, नेहमी घरात वापरायला वेगळी, स्पोर्टसाठी वेगळी...मला या विविधतेचं खूप अप्रूप वाटतं. आणि आजच्या तरुण पिढीचं कौतुकही वाटतं. मध्यंतरी एका मॉलमध्ये गेले होते, तेव्हा तिथे एका मुलीनं एक ब्रेसिअर घेतली...मुल्य चारशे रुपये...आणि त्यात सूट होती..त्यावर अजून एक फ्री मिळणार होती...तिनं फ्री असलेल्या ब्रेसिअरची मागणी केली...तेव्हा तिला जी ब्रेसिअर घेण्यास सुचवण्यात आलं, त्यात तिला हवी तशी नव्हती...तिनं नकार दिला आणि आपली गरज काय हे त्या काऊंटरवर असलेल्या सेल्समनला सांगितले. तो मुलगा होता...तरीही त्याच्याशी संवाद साधतांना तिनं कुठलाही संकोच बाळगला नाही, आणि त्या सेल्समननही...
एकूण काय एक टप्पा बदलला आहे.
पण माझ्याकडे आलेल्या या दोघी या सर्व टप्प्यांपासून खूप दूर होत्या....साध्या
गावात रहाणा-या मायलेकी. नवरा गेल्यावर
आम्ही तिघीही एकत्र नाष्ट्याला बसलो...लेकीला विचारलं, गावाच्या घरात तू असेच कपडे
वाळवतेस का...कोप-यात..ती म्हणाली हो...हे कपडे बाहेर वाळवतांना आईनं बघितलं तर ती
ओरडते...तिचेही कपडे असेच कोप-यात असतात...बाकी ठिक आहे. पण पावसाळ्यात खूप त्रास होतो...कपडे ओलेच
रहातात...ब-याचवेळा असेच ओले कपडे घालून वावरावं लागतं...त्याचा नंतर त्रास
होतो...हे सर्व सांगतांना तिची आई मान खाली घालून गप्प नाष्टा करत होती...ती
म्हणाली, मी काय करु...मी अशाच वातावरणात मोठी झाले. लग्न झाल्यावर सासरी आल्यावर सासूनं एक जागा
दाखवली. इथेच कपडे घाल म्हणून
सांगितलं...आता तिच जागा मी लेकीला दाखवलीय...मी डोक्यावर हात मारुन घेतला...मी
तिला या कपड्यांचे महत्त्व सांगितलं...आता किती त्यात बदल येत आहेत याची माहिती
दिली. हे ऐकून त्या मायलेकींचे डोळेच मोठे
झाले...एवढे प्रकार येतात...आम्हाला माहितच नव्हतं म्हणून त्यांनी कबूली दिली...तुमचं
काम झालं की आपण दुकानात जाऊ...मी तुम्हाला दाखवते...आणि थोडे खरेदी करु...त्या
मुलीची कळी खुलली....
आमच्या गप्पा चालू असतांना चुकून टिव्ही लावला तर त्याच्यावर दिल्लीमधील कुठल्याशा मुलीची बातमी चालू होती. या मुलीनं मेट्रोमध्ये टू पीस बिकीनीमध्ये प्रवास केला. एका हौशी पत्रकारानं तिला गाठलं होतं, आणि तिची मुलाखत चालू होती. स्वातंत्र्य....त्याचे फायदे आणि घेतलेले गैरफायदे....हे असंच काहीतरी होतं....त्याच्यावर चर्चा चाललेली...ती बातमी बघतांना तर त्या दोघी इतक्या लाजल्या होत्या की ती मुलगी जणू त्यांच्यासमोरच उभी आहे...काय हे...म्हणत त्यांनी नजर फिरवली.....मी चॅनल बदललं आणि गाणी लावली...नंतर आवराआवर करतांना विचार आला...किती फरक आहे, एकीकडे जागृतीची गरज आहे, आणि एकीकडे जागृतीच्या नावावर विकृती पसरतेय...एकूण काय एकाच नाण्याचा दोन बाजू...पण जमीन आस्मानाचा फरक असलेल्या...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
अतिशय विचारपूर्वक लिहिले आहेस!!अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांना उत्तरं आपल्याला शोधायची आहेत. खूप उत्तम लेख!!
ReplyDeleteधन्यवाद
Deleteउत्तम नेहमी प्रमाणे परखड मत मांडली आहेस
ReplyDeleteधन्यवाद
Deleteआपला लेख खुप छान आहे.जीवनाशी निगडीत व महत्वाचे विषय निवडले आहेत.
Deleteखूप छान लिहिलं आहेस.
ReplyDeleteधन्यवाद...
DeleteKhup chhan lekh.
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteगावाकडे अजूनही अशी मानसिकता बघायला मिळते ,जागरूकता व्हायला हवीय
ReplyDeleteहे खरं आहे....जागरुकताच महत्त्वाची...
DeleteUttam vishay. Agadi vichar karun mandala ahes.Ani ya babtit prabodhanachi garaj hi ahe.
ReplyDeleteनक्कीच....मुळात नव्या पिढीला याबाबतीत माहिती असते...त्या माहितीचा आदर ठेवला पाहिजे...
Deleteअत्यंत जिव्हाळ्याचा विषय अतिशय छान हाताळलायस. अभिनंदन
ReplyDeleteताई तुमचा लेख वाचला, अतिशय सुंदर माहिती, जनजागृतीसाठी उचललेले हे पाऊल खूपच महत्त्वाचे आहे. तुमच्या कल्पकतेला सलाम. 🙏🙏🌹
ReplyDeleteतू जरा जास्त खरं बोलते
ReplyDelete