प्रवास निनादचा...
वेगळ्या वाटेचा...
सध्या दिवस निकालांचे आहेत....शाळा...कॉलेजच्या निकालांचे....वर्षभर केलेल्या अभ्यासाचे फलीत देणारे हे निकाल म्हणजे विद्यार्थ्यांच्या पुढच्या भविष्याचा आरसा मानण्यात येतात. या एक वर्षभर केलेल्या अभ्यासावरुन येणारा निकाल त्या विद्यार्थ्याच्या भविष्याची गती सांगतो...वास्तविक हा पुस्तकी ज्ञानाची परीक्षा घेणारा प्रकार...पण यावरुन त्या मुलाची सर्वच क्षेत्रात परीक्षा होते...त्याच्यासोबत त्याच्या पालकांचीही परीक्षा असते...मुलांचे गुण किती हा पहिला प्रश्न विचारला जातो...आणि मग तो मुलगा काय शिकणार याची चौकशी होते..त्यावरुन त्याची पुढची दिशा कशी असेल याची भविष्यवाणी होते...पण यातही एखादा अवलिया निघतो...तो कधीही सरळ मार्गानं जात नाही...किंबहूना तो सतत प्रयोग करत रहातो...त्यातून स्वतःला तोलून मापून बघतो...पुन्हा पुन्हा वेगळा मार्ग पकडण्याचा प्रयत्न करतो....अगदी बिंधास्त मागे फिरतो...आणि मग जेवढ्या जोरात खाली येतो, तेवढ्याच जोरात वर जातो...समाजानं ठरवेल्या शिक्षणाच्या साच्यातून स्वतःला मुक्त करतो...आणि आपले स्थान निश्चित करतो....सोबत अन्य मुलांनाही मार्गदर्शक ठरतो....अशाच एका अवलियाबरोबर माझी नुकतीच भेट झाली....त्याचे नाव आहे, निनाद भागवत...निनाद सध्या अमेरिकेच्या मोंटाना टेक्नोलॉजी विद्यापिठात पीएचडी करीत आहेत. हा निनाद भूभौतिक शास्त्रज्ञ आहे. ओळख भूशास्त्राची या पुस्तकाचा लेखक आहे. दहावीपर्यंत मराठीत शिक्षण झालेल्या या निनादबरोबर संवाद साधतांना शिक्षणपद्धतीच्या अनेक पारंपारिक प्रवाहांना त्यांनी बाजूला सारत स्वतःचा वेगळा प्रवाह निर्माण केल्याची जाणीव झाली.
गेल्या महिन्यात डोंबिवलीच्या पै फ्रेण्ड्स लायब्ररीतर्फे ओळख भूशास्त्राची या
पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मी केले. अशा कार्यक्रमात प्रथम पुस्तकाच्या लेखकाबरोबर बोलावे लागते. पण गम्मत म्हणजे, या पुस्तकाचा लेखक निनाद भागवत, हा अमेरिकेत होता...तेथून तो या कार्यक्रमाला व्हिडिओ कॉलद्वारे उपस्थित रहाणार होता...बाकी सर्व जबाबदारी त्याची आई, मधुरा भागवत या सांभाळत होत्या...मला इथेच खूप उत्सुकता वाटली....मग मधुरा भागवत यांच्याबरोबर बोलणं झालं...ओळख भूशास्त्राची या पुस्तकाची पार्श्वभूमी सांगताना त्यांनी निनादच्या एकूण शैक्षणिक प्रवासाची माहिती दिली....हा सर्व प्रवास ऐकतांना माझंच डोकं गरगरलं...किती उड्या मारल्या होत्या या पठ्यानं....हे सर्व ऐकतांना जाणवत होतं की मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे काही करायचं स्वातंत्र देणं....त्यांच्यावर पालकांनी विश्वास ठेवणं किती गरजेचं असतं ते...
निनादचे दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले. दहावीला 81 टक्के गुण...मग प्रचलित मार्ग स्विकरत त्यानं अकरावी सायन्सला प्रवेश घेतला...पण मराठीतून थेट इंग्रजी आल्यानं निनादला ते अवघड वाटलं...म्हणून त्यानं बारावीला चक्क कलाशाखेत प्रवेश घेतला. बारावीनंतर त्यानं ठाण्याच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. सर्वात निनादला व्हीडिओ गेमींगमध्ये आवड निर्माण झाली. पुढे याच क्षेत्रात काहीतरी करायचं असा त्याचा निश्चय होताहोता त्याला जाणीव झाली की, कलाशाखेपेक्षा आपल्याला
सायन्समध्येच अधिक गदी आहे. मग त्यानं युटर्न घेतला. डोंबिवलीच्या अभिनव विद्यालयातून पुन्हा 12वीची परीक्षा सायन्समधून दिली. त्यावेळी त्याला जिओलॉजी हा विषय होता. इथे जिओलॉजी विषय निनादला भेटला आणि त्याच्या आयुष्याला वेगळा आकार मिळायला सुरुवात झाली. दोनवेळा बारावीची परीक्षा त्यानं उत्तीर्ण केली. एकदा कला शाखेत तर दुस-यावेळेला सायन्समध्ये...अशावेळी गुणपत्रिकांचा किती घोळ झाला असेल विचारु नका...निनाद आणि त्याच्या आईला विद्यापिठाचा जीआर आणेपर्यंत धावपळ करावी लागली होती. दुस-यांदा बारावी उत्तीर्ण करत निनादनं गुणांची नव्वदी पार केली. मग त्यानं सोमय्या कॉलेजमध्ये बीएससीसाठी प्रवेश घेतला....अर्थात एव्हाना जिओलॉजी हा विषय त्याचा साथी झाला होता. हा प्रवेश झाल्यावर पुन्हा युटर्न घ्यावा लागला. कारण इंजिनिअरिंगच्या प्रवेशाच्या परीक्षाही तो देत होता. त्याचा हरणे इंजिनिअरिंगमध्ये नंबर लागला. इथेही त्यानं सिव्हील इंजिनिअरिंगला पसंती दिली...का तर त्यात त्याचा आवडता विषय जिओलॉजी होता...या कॉलेजमधून पहिल्या क्रमाकांनी निनादनं इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली. त्याचा गुणाचा रेकॉर्ड अजूनही कोणी मोडू शकलं नाही, हे आणखी एक विशेष.
त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी निनाद अमेरिकेच्या मोंटेना टेक्नोलॉजी युनिव्हर्सिटीमध्ये दाखल झाला. तो स्कॉलरशिपवर या विद्यापीठात दाखल झाला. येथे खाणींमध्ये अगदी 600 फूट आत जाऊन द्रोणच्या माध्यमातून संशोधन करण्याचे काम त्याच्याकडे होते. द्रोणच्या माध्यमातून या खाणींच्या दगडांच्या प्रतिमा काढायच्या....मग त्यातील पाण्याचा अभ्यास करायचा...त्यावरुन भविष्यातील हवामानाचे निष्कर्ष काढायचे, अशा स्वरुपाचे काम निनाद करत असे. हे काम सुरुळीत सुरु असतांनाच अचानक त्याला पोटदुखीचा त्रास सुरु झाला. हा त्रास एवढा वाढला, की निनादनं परत येण्याचा निर्णय घेतला. पुन्हा एकदा त्याच्या आयुष्यात युर्टन आला...तो भारतात परतला तो थेट हॉस्पिटलमध्येच भरती झाला. पुढचे जवळपास दोन महिने त्यानं हॉस्पिटलमध्येच घालवले. त्यानंतर पुढे काय करायचे हा प्रश्न होता. काहीवेळ त्यानं जिथून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले, तिथे लेक्चरर म्हणूनही काम केलं. एक सहज म्हणून त्याच्या प्रवासावर लेख लिहिला....त्यातून भूशास्त्रावर लेखमाला लिहिण्याची संधी त्याला
मिळाली....आणि त्याच लेखमालेतील लेखांवर आधारीत निनादचे पुस्तक ओळख भूशास्त्राची हे आता या विषयाचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांसाठी योग्य मार्गदर्शक ठरत आहे.
निनादच्या आईकडून मी
हा सगळा प्रवास ऐकला...तेव्हापासूनच निनादला भेटायची उत्सुकता होती. निनाद अमेरिकेहून आला तेव्हा त्याला भेटण्याचा
योग आला. त्याच्याकडून पुन्हा एकदा त्यानं
ज्या शैक्षणिक उड्या मारल्या आहेत, त्याची माहिती घेतली. यात सर्वात त्याची काय भूमिका होती, हे मला
जाणून घ्यायचं होतं...निनादनं यावर अगदी सोप्प्या शब्दात उत्तर दिलं...जे आवडतं ते
करायचं...आणि आपण जेव्हा खाली पडतो असं वाटतं तेव्हाच आपण तेवढ्याच जोरानं वर
उचलले जातो...कोण काय बोलेल याची काळजी करायची नाही....जे आपल्याला
जमेल...आवडेल...तिच दिशा पकडायची....तिथेच आपला सुवर्णकाळ असतो...
आजारपणामुळे
अमेरिकेहून परतलेला निनाद पुन्हा त्याच्या युनिव्हर्सिटीमध्ये दाखल झाला...तिथे
त्याच्यासोबतचे विद्यार्थी पुढे गेले होते...त्याला मार्गदर्शन करणारे शिक्षकही
बदलले होते...मग निनादनं नव्यानं अभ्यास केला.
मोंटाना
टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून त्यानं जिओफिजिकल इंजिनिअरिंग यात एम.एस. पूर्ण
केले. आता त्याच युनिव्हर्सिटीमध्ये निनाद
पृथ्वी विज्ञान आणि अभियांत्रिकी मध्ये पीएचडी करीत आहे. अत्यंत क्लिष्ठ अशा या विषयाचा अभ्यास करणारे
विद्यार्थी कमी आहेत. त्यामुळे निनादबद्दल
अधिक अभिमान वाटतो.
शिक्षणात आलेल्या अडचणी...पुढे आरोग्याच्या
तक्रारी...या सर्वांवर मात करत त्यानं आपला मार्ग स्वतः तयार केला. आज त्याचे ओळख भूशास्त्राची हे पुस्तक या मार्गावर येऊ पाहणा-या विद्यार्थ्यांसाठी
योग्य मार्गदर्शन देत आहे. विशेष म्हणजे
पुस्तक मराठीत उपलब्ध आहे. मराठीत या
विषयावर अत्यंत कमी पुस्तके आहेत. निनादने
या पुस्तकात भूविज्ञान
विषय म्हणजे काय हे स्पष्ट केले आहे. ज्या
विद्यार्थ्यांना भूविज्ञान किंवा त्या विषयात करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी हे
पुस्तक वरदान ठरणार आहे.
निनादबरोबर बोलतांना मला त्याचे आणि त्याच्या पालकांचेही कौतुक वाटत
होते. आपल्याला जे आवडते ते पालकांना सांगतांना जसा संकोच करायचा नसतो...तसेच आपल्याला हे जमत नाही, हे पालकांना सांगतांनाही मुलांनी संकोच करायचा नसतो. मुख्य म्हणजे, पालकांनीही मुलांनी आपल्याला काही जमत नाही, असे सांगितले तर ते स्विकारुन मुलांची मानसिकता जाणून घेणं महत्त्वाचं असतं...निनादचा सर्व प्रवास ऐकतांना त्याचा अवघड विषय जेवढा सहजरित्या समजला, तसेच शिक्षणाच्या वाटेतील ठराविक साचे कसे मोडून नव्या प्रवाहाला वाट करुन दिली याची जाणीव झाली...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Very good inspiring.
ReplyDeletePl read the review on same book in VIVEK marathi magzin,.
Khup chhan lekh
ReplyDeleteलेख छान झाला आहे. माझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासाचे सुंदर प्रवासवर्णन आले आहे. 'ओळख भूशास्त्राची' हे पुस्तक माझ्याकडेच विक्रीसाठी उपलब्ध आहे. संपर्कासाठी ऑगस्ट पर्यंत 9892723155 या माझ्या temporary number वर मी स्वतः उपलब्ध आहे, तर 9869120582 या number वर ऑगस्टनंतरही माझी आई उपलब्ध आहे. हे पुस्तक पै फ्रेंड्स लायब्ररी, डोंबिवली येथेही विक्रीसाठी उपलब्ध आहे.
ReplyDeleteInspiring ahe Ninadcha pravas...
ReplyDeleteलेख खौप छान आहे.चंचलता,आत्मविश्वास,मेहनत करण्याची जिध्द दिसते.मुलांना मार्गदर्शक ठरावा असा लेख आहे.अभिनंदन🌹🌹
ReplyDelete