ती एक स्वरुपिणी

 ती एक स्वरुपिणी


आपल्या आयुष्यात अनेकवेळा अशा काही व्यक्ती येतात, की त्यांचा साधेपणा मनाला प्रंचड भावतो.  नाव, पैसा, हुद्दा मोठा असूनही ही मंडळी साध्या, सरळ स्वभावाच्या व्याजावरच आपल्याला जिंकून घेतात.  अशीच एक व्यक्ती माझ्या आयुष्यात काही वर्षापूर्वी आली.  सौ.  सुवर्णा प्रभाकर राणे.  स्वरुपिणी नावाच्या एका महिला मंडळाच्या त्या तेव्हा अध्यक्षा होत्या.  या मंडळाच्या कार्यक्रमाला त्यांनी मला आवर्जून बोलावलं होतं.  या आधी आमची भेट ही, फक्त फोनच्या माध्यमातूनच झालेली.  प्रत्यक्ष भेट झाली तेव्हा सुवर्णाताईंच्या स्वभावातील एक-एक आवरणं समजू लागली.  मध्यम उंची, चापून चोपून नेसलेली साडी, केसांचा अंबाडा, त्यावर मोग-याचा गजरा,  कपाळावर मोठी टिकली आणि चेह-यावर मातृत्वाचा आनंद.  पहिल्या भेटीतच त्यांच्या स्वभावानं आमच्यामध्ये एक वेगळं नातं तयार झालं.  माझ्या प्रत्येक ब्लॉगला त्या आवर्जून प्रतिसाद देऊ लागल्या.  मग गप्पांचा ओघ वाढला, तसा सुवर्णाताईंचा अधिक परिचय झाला.  सुवर्णाताई म्हणजे, जिथं जातील, त्या भूमिकेत परफेक्ट बसणारं व्यक्तिमत्व.  पत्नी, आई, सासूबाई, आजी या कौटुंबिक नात्यांनाही त्यांनी सहजपणे गुंफलं आहे.  सोबत स्वरुपिणी सारख्या महिला मंडळाच्या अनेक सदस्यांची मैत्रिण, उत्तम सायकलपटू, उत्कृष्ठ कलाकार, उत्तम संघटक, उत्तम गायिका....अशा अनेक भूमिकांमधल्या सुवर्णाताईंचा परिचय झाला. 


सुवर्णा राणे म्हणजे बहुअंगी व्यक्तिमत्व.  कोल्हापूर जिल्ह्यातील मनपाडळे नावाच्या खेडेगावात त्यांचा जन्म झाला.  या खेडेगावत इयत्ता 4 थी पर्यंत शिक्षणाची सोय होती.  पुढच्या शिक्षणासाठी मामाच्या घरी, सांगलीला त्यांना नेण्यात आलं.  अभ्यासात हुशार असलेल्या सुवर्णाताईंना दहावीची परीक्षा मात्र देता आली नाही.  दहावीची परीक्षा असतानाच त्याचं लग्न ठरलं.  सौ. सुवर्णा प्रभाकर राणे म्हणून त्या डोंबिवलीत रहायला आल्या.  संसार सुरु झाला तरी मनात शिक्षण अपूर्ण राहिल्याची रुखरुख होती.  प्रभाकर राणे हे आयकर विभागात मोठ्या हुद्यावर होते.  त्यांनी सुवर्णाताईंना घरातून 10वी ची परीक्षा देण्यास सुचवलं.  मग सुवर्णाताईंनी 12 वी ची परीक्षाही दिली.  12वी झाल्यावर मात्र त्यांनी मागे वळून बघितलं नाही.  इतिहास या विषयातून त्यांनी बी.ए. आणि एम. ए. पर्यंतचे शिक्षण घेतले.  या शिक्षणामध्ये कौटुंबिक जबाबदा-याही त्या पार पाडत होत्या.  शिवाय त्यांनी आपले छंदही जोपासले.  शिवणकाम, विणकाम, चित्रकला, पाककृती, पार्लर असे कितीतरी अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केले.  देवेंद्र आणि मानवेंद्र या दोन मुलांचा सांभाळ करत शिक्षण, छंद त्या सफाईदारपणे सांभाळत होत्या.  या सर्वात त्यांचा परिचय ज्ञानदीप मंडळाच्या आकाशानंद यांच्याबरोबर झाला.  सुवर्णाताईंच्या कामाचा झपाटा बघून त्यांनी सुवर्णाताईंना मंडळात सामिल होण्याचा आग्रह केला.  ही सुवर्णाताईंच्या सामाजिक कार्यातील पहिली पायरी ठरली.  यातूनच त्या विघ्नेश ज्ञानदीप मंडळाच्या अध्यक्षा झाल्या.  या कार्यकालात सुवर्णाताईंनी अनेक सहलींचे आयोजन

केले.  उपक्रम राबवले.  इगतपुरी येथील वृद्धाश्रम दोन वर्ष चालवले.  त्यांच्या या कार्यातून त्यांचा गुरवर्य प्रतिभाताई बिवलकर यांच्या बरोबर परिचय झाला.  प्रतिभाताई यांनी स्वरुपिणी नावाच्या महिला मंडळाची स्थापना केली होती.  प्रतिभाताईंनी सुवर्णाताईंना या मंडळात सामिल करुन घेतलेच, पण त्यांच्यावर खजिनदार म्हणून जबाबदारीही सोपवली.  मुळात प्रतिभाताई बिवलकर हे प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व.  प्रतिभाताईंना गुरुस्थानी मानणा-या सुवर्णाताईंना त्यांनी मंडळाचे महत्त्व शिकवले.  तसेच महिलांच्या एकीतून काय करु शकतो, याचे धडेही दिले.  यातून सुवर्णाताईंच्या व्यक्तिमत्वाला आकार मिळायला सुरुवात झाली.  खजिनदार म्हणून जबाबदारी पार पाडतांना लेखापरिक्षण करत असतांना एका मान्यवर सीए ने एवढं चोख काम मी कुठेही पाहिलेलं नाही, अशी शाबासकी सुवर्णाताईंना दिली.  याच स्वरुपिणी महिला मंडळाच्या त्या मग अध्यक्षा झाल्या.  या कार्यकालात विविधांगी उपक्रम राबवण्यावर त्यांनी भर दिला.  शिशिर ऋतूमध्ये येणा-या धुंधुरमासचे महत्त्व जाणून धुंधुरमास करायला सुरुवात केली.  आषाढी एकादशीचे औचित्य साधून संपूर्ण डोंबिवलीमधून भजन स्पर्धा घेतली.  चैत्रगौरीच्या निमित्तानं वर्षभरात साजरे होणा-या सर्व सणांची माहिती देणारी सजावट केली. महिला दिनानिमित्त सामाजिक कार्यात पुढे असलेल्या महिलांचा सत्कार सुरु केला.  सुवर्णाताई ज्या वर्षात स्वरुपिणीच्या अध्यक्षा होत्या, त्याच काळात कोरोना महामारी आली.  अशावेळी ऑनलाईनच्या माध्यमातून त्यांनी आपल्या सर्व सभासद

मैत्रिणींना एकत्र ठेवले.  दर बुधवारी होणारे मंडळाचे कार्यक्रम खंड न पडता साजरे केले.  कोरोनाचा फटका बसलेल्या सभासदांच्या घरी डबे देण्यापासून ते त्यांच्या कुटुंबाची काळजी घेण्याचे काम त्यांनी केले.  गुरुपौर्णिमेच्या दिनानिमित्त त्यांनी सर्वांकडून आपल्या गुरुंबद्दल निबंध लिहून घेतले.  अशा निबंधांचे, कृतज्ञतेची शब्द फुले नावाचे पुस्तक त्यांनी तयार करुन घेतले. 

समाजकार्यात हिरारीनं पुढे असलेल्या सुवर्णाताई यांनी कोल्हापूर महानगरपालिकेत नगरसेवकपदही भुषविले आहे.  कोल्हापूरमध्ये एक हॉटेल व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या मोठ्या मुलाच्या आग्रहावरुन सुर्वणाताईंनी राजकारणातही प्रवेश केला.  त्या कार्यकालत त्या सातत्यानं डोंबिवली ते कोल्हापूर असा प्रवास करीत असत.  या सर्वात आपल्या कुटुंबासाठी सुवर्णाताई वेळ कधी काढतात, हा प्रश्न पडला असेल, तर नक्की थांबा.  कारण देवेंद्र आणि मानवेंद्र या दोन मुलासह त्यांना मनाली नावाची एक मुलगीही आहे.  त्यांच्याच परिचित असलेल्या या कुटुंबातील ही मनाली या सुवर्णाताईंच्या हाताखाली एवढी रुळली, की या राणेंच्या घरात लेक म्हणून मनाली राहू लागली.  मनालीच्या शिक्षणाची सर्व  जबाबदारी सुवर्णाताईंनी पार पाडली आहे. एमबीए झालेल्या या लेकीचा सुवर्णाताईंना खूप अभिमान आहे.  सुवर्णाताई आणि त्यांचे पती, आपल्याला दोन मुलं आणि एक मुलगी असल्याचे अभिमानानं सांगतात. 

सुवर्णाताईंच्या मोठ्या सुनेला, स्वातीला कॅन्सर असल्याचे निदान आले.  तेव्हा सुवर्णाताई मनानं खचल्या.  मात्र सुनेला या संकटातून बाहेर काढायचे, या निश्चयानं त्यांनी निदान झाल्यापासून तीन वर्ष डॉक्टरांकडे फे-या मारल्या.  सुनेच्या या आजारपणात दोन लहान नातवंडांची जबाबदारी त्यांच्यावर आली.  तीन वर्षानंतर मोठी सून स्वाती हिचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला.  या घटनेनं सुवर्णाताईंना हादरुन सोडलं होतं.  अशातून त्यांना त्यांच्या स्वरुपिणीच्या मैत्रिणींनी बाहेर काढलं.  यासर्वातून बाहेर पडत असतांना त्यांच्या लहान भावाचा ह्दयविकारानं मृत्यू झाला.  या लहान भावानं सुवर्णाताईंना खूप साथ दिलेली.  या भावाची पत्नी आणि मुलांना सांभळण्याची जबाबदारीही मग सुवर्णाताईंनी घेतली.  यातच मोठ्या जावेचा मृत्यू झाला.  मग या  दिराच्या मुलांनाही सुवर्णाताईंनी आपल्या मायेच्या पदराखाली घेतले.  आता ही सर्व मुलं उच्चशिक्षित असून सुवर्णाताईंना त्यांचा खूप अभिमान आहे.  सध्या आजी असलेल्या सुवर्णाताई धाकटा मुलगा मानवेंद्र याचा मुलाग अद्वैत


याच्या कोडकौतुकात व्यस्त असातात.   सासर आणि माहेर यातील नातीगोती त्यांनी जीवपाड जपली आहेत.  बरं या सर्वातून वेळ काढत सुवर्णाताई भजन शिकतात.  न चुकता दर गुरुवारी त्यांचा भजनाचा वर्ग असतो.  दत्त संप्रदायाच्या त्या अनुयायी आहेत.  अक्षदा भक्ती गित मंडळाच्या त्या अध्यक्षा आहेत.  त्यातून त्या डोहाळ जेवण, बारसे किंवा घरगुती कार्यक्रमात खेळांचा कार्यक्रम करतात.  पथनाट्य करतात.  एव्हरग्रीन सायकल प्रेमी ग्रुपच्या त्या अध्यक्षा आहेत.  त्या स्वतः साकयकल चालवतात.  रोज किमान चार किलोमिटर सायकल चालवण्याचा त्यांचा नेम आहे.  या सायकल क्लबच्या माध्यमातून त्यांनी अनेक घरकाम करणा-या महिलांना सायकल शिकवून सायकली दिल्याही आहेत.  या महिला आता रोज कामावर जातांना या सायकलींचा वापर करतात.  या त्यांच्या सायकल क्लबमध्ये वय वर्ष पाच ते सत्तरीच्या आजीही येतात.  सुवर्णाताई त्यांना सायकल चालवायला शिकवतात.  यातून पर्यावरणाचा समतोल साधता येतो, असं त्या नेहमी सांगतात.  याच माध्यामातून त्यांनी उंबर्ली टेकडीवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले आहे.  या वृक्षांची निगराणी करण्यासाठी सायकलवरुन महिन्यातून एकवेळ या भागात फेरी मारतात.  राखी पौर्णिमेला आपल्या सर्व मैत्रिणींकडून त्या राख्या तयार करुन घेतात, आणि एका पत्रासह या राख्या सीमेवरील जवानांना पाठवतात. 

कुठलंही काम हाती घेतलं तर ते पूर्णत्वास न्यायचं हा त्यांचा स्वभाव आहे.  मध्यंतरी त्यांचे पती हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये दाखल होते.  त्याच दिवसात मंडळात होणा-या एका पथनाट्यात त्या सहभागी होणार होत्या.  त्यांची प्रमुख भूमिका होती.  जवळपास महिनाभर त्यांनी आणि त्यांच्या


मैत्रिणींना या पथनाट्यासाठी मेहनत घेतली होती.  त्या गेल्या नसत्या तर त्यांच्या गटाचे पथनाट्य रद्द झाले असते.  मग सुवर्णाताई अशाही परिस्थितीत पथनाट्य सादरीकरणासाठी गेल्या.  आपल्यामुळे आपल्या सहका-यांचे नुकसान होऊ नये,  ही त्यामागे त्यांची भूमिका होती.  हाच त्यांचा स्वभाव माझ्या मनाला भावतो.  कधीही, कुठेही भेटल्यावर मी कोण आहे, मी काय केलं, याची बढाई न मारता, त्या समोरच्या व्यक्तीची आपुलकीनं गप्पा मारतात.  याच स्वभावामुळे बहुधा मी त्यांना त्यांच्याबद्दल विचारायला गेले, तेव्हा त्यांचं पहिलं वाक्य होतं, मी काय केलंय, फार काही नाही.   त्यांच्या साध्या, सरळ स्वभावामुळे त्यांच्या खात्यात अगणित मैत्रिणी, नातेवाईक आणि आप्तेष्टांची जमापूंजी आहे. 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

आपल्या आयुष्यात अनेकवेळा अशा काही व्यक्ती येतात, की त्यांचा साधेपणा मनाला प्रंचड भावतो.  नाव, पैसा, हुद्दा मोठा असूनही ही मंडळी साध्या, सरळ स्वभावाच्या व्याजावरच आपल्याला जिंकून घेतात.  अशीच एक व्यक्ती माझ्या आयुष्यात काही वर्षापूर्वी आली.  सौ.  सुवर्णा प्रभाकर राणे.  स्वरुपिणी नावाच्या एका महिला मंडळाच्या त्या तेव्हा अध्यक्षा होत्या.  या मंडळाच्या कार्यक्रमाला त्यांनी मला आवर्जून बोलावलं होतं.  या आधी आमची भेट ही, फक्त फोनच्या माध्यमातूनच झालेली.  प्रत्यक्ष भेट झाली तेव्हा सुवर्णाताईंच्या स्वभावातील एक-एक आवरणं समजू लागली.  मध्यम उंची, चापून चोपून नेसलेली साडी, केसांचा अंबाडा, त्यावर मोग-याचा गजरा,  कपाळावर मोठी टिकली आणि चेह-यावर मातृत्वाचा आनंद.  पहिल्या भेटीतच त्यांच्या स्वभावानं आमच्यामध्ये एक वेगळं नातं तयार झालं.  माझ्या प्रत्येक ब्लॉगला त्या आवर्जून प्रतिसाद देऊ लागल्या.  मग गप्पांचा ओघ वाढला, तसा सुवर्णाताईंचा अधिक परिचय झाला.  सुवर्णाताई म्हणजे, जिथं जातील, त्या भूमिकेत परफेक्ट बसणारं व्यक्तिमत्व.  पत्नी, आई, सासूबाई, आजी या कौटुंबिक नात्यांनाही त्यांनी सहजपणे गुंफलं आहे.  सोबत स्वरुपिणी सारख्या महिला मंडळाच्या अनेक सदस्यांची मैत्रिण, उत्तम सायकलपटू, उत्कृष्ठ कलाकार, उत्तम संघटक, उत्तम गायिका....अशा अनेक भूमिकांमधल्या सुवर्णाताईंचा परिचय झाला. 

सुवर्णा राणे म्हणजे बहुअंगी व्यक्तिमत्व.  कोल्हापूर जिल्ह्यातील मनपाडळे नावाच्या खेडेगावात त्यांचा जन्म झाला.  या खेडेगावत इयत्ता 4 थी पर्यंत शिक्षणाची सोय होती.  पुढच्या शिक्षणासाठी मामाच्या घरी, सांगलीला त्यांना नेण्यात आलं.  अभ्यासात हुशार असलेल्या सुवर्णाताईंना दहावीची परीक्षा मात्र देता आली नाही.  दहावीची परीक्षा असतानाच त्याचं लग्न ठरलं.  सौ. सुवर्णा प्रभाकर राणे म्हणून त्या डोंबिवलीत रहायला आल्या.  संसार सुरु झाला तरी मनात शिक्षण अपूर्ण राहिल्याची रुखरुख होती.  प्रभाकर राणे हे आयकर विभागात मोठ्या हुद्यावर होते.  त्यांनी सुवर्णाताईंना घरातून 10वी ची परीक्षा देण्यास सुचवलं.  मग सुवर्णाताईंनी 12 वी ची परीक्षाही दिली.  12वी झाल्यावर मात्र त्यांनी मागे वळून बघितलं नाही.  इतिहास या विषयातून त्यांनी बी.ए. आणि एम. ए. पर्यंतचे शिक्षण घेतले.  या शिक्षणामध्ये कौटुंबिक जबाबदा-याही त्या पार पाडत होत्या.  शिवाय त्यांनी आपले छंदही जोपासले.  शिवणकाम, विणकाम, चित्रकला, पाककृती, पार्लर असे कितीतरी अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केले.  देवेंद्र आणि मानवेंद्र या दोन मुलांचा सांभाळ करत शिक्षण, छंद त्या सफाईदारपणे सांभाळत होत्या.  या सर्वात त्यांचा परिचय ज्ञानदीप मंडळाच्या आकाशानंद यांच्याबरोबर झाला.  सुवर्णाताईंच्या कामाचा झपाटा बघून त्यांनी सुवर्णाताईंना मंडळात सामिल होण्याचा आग्रह केला.  ही सुवर्णाताईंच्या सामाजिक कार्यातील पहिली पायरी ठरली.  यातूनच त्या विघ्नेश ज्ञानदीप मंडळाच्या अध्यक्षा झाल्या.  या कार्यकालात सुवर्णाताईंनी अनेक सहलींचे आयोजन केले.  उपक्रम राबवले.  इगतपुरी येथील वृद्धाश्रम दोन वर्ष चालवले.  त्यांच्या या कार्यातून त्यांचा गुरवर्य प्रतिभाताई बिवलकर यांच्या बरोबर परिचय झाला.  प्रतिभाताई यांनी स्वरुपिणी नावाच्या महिला मंडळाची स्थापना केली होती.  प्रतिभाताईंनी सुवर्णाताईंना या मंडळात सामिल करुन घेतलेच, पण त्यांच्यावर खजिनदार म्हणून जबाबदारीही सोपवली.  मुळात प्रतिभाताई बिवलकर हे प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व.  प्रतिभाताईंना गुरुस्थानी मानणा-या सुवर्णाताईंना त्यांनी मंडळाचे महत्त्व शिकवले.  तसेच महिलांच्या एकीतून काय करु शकतो, याचे धडेही दिले.  यातून सुवर्णाताईंच्या व्यक्तिमत्वाला आकार मिळायला सुरुवात झाली.  खजिनदार म्हणून जबाबदारी पार पाडतांना लेखापरिक्षण करत असतांना एका मान्यवर सीए ने एवढं चोख काम मी कुठेही पाहिलेलं नाही, अशी शाबासकी सुवर्णाताईंना दिली.  याच स्वरुपिणी महिला मंडळाच्या त्या मग अध्यक्षा झाल्या.  या कार्यकालात विविधांगी उपक्रम राबवण्यावर त्यांनी भर दिला.  शिशिर ऋतूमध्ये येणा-या धुंधुरमासचे महत्त्व जाणून धुंधुरमास करायला सुरुवात केली.  आषाढी एकादशीचे औचित्य साधून संपूर्ण डोंबिवलीमधून भजन स्पर्धा घेतली.  चैत्रगौरीच्या निमित्तानं वर्षभरात साजरे होणा-या सर्व सणांची माहिती देणारी सजावट केली. महिला दिनानिमित्त सामाजिक कार्यात पुढे असलेल्या महिलांचा सत्कार सुरु केला.  सुवर्णाताई ज्या वर्षात स्वरुपिणीच्या अध्यक्षा होत्या, त्याच काळात कोरोना महामारी आली.  अशावेळी ऑनलाईनच्या माध्यमातून त्यांनी आपल्या सर्व सभासद मैत्रिणींना एकत्र ठेवले.  दर बुधवारी होणारे मंडळाचे कार्यक्रम खंड न पाडता साजरे केले.  कोरोनाचा फटका बसलेल्या सभासदांच्या घरी डबे देण्यापासून ते त्यांच्या कुटुंबाची काळजी घेण्याचे काम त्यांनी केले.  गुरुपौर्णिमेच्या दिनानिमित्त त्यांनी सर्वांकडून आपल्या गुरुंबद्दल निबंध लिहून घेतले.  अशा निबंधांचे, कृतज्ञतेची शब्द फुले नावाचे पुस्तक त्यांनी तयार करुन घेतले. 

समाजकार्यात हिरारीनं पुढे असलेल्या सुवर्णाताई यांनी कोल्हापूर महानगरपालिकेत नगरसेवकपदही भुषविले आहे.  कोल्हापूरमध्ये एक हॉटेल व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या मोठ्या मुलाच्या आग्रहावरुन सुर्वणाताईंनी राजकारणातही प्रवेश केला.  त्या कार्यकालत त्या सातत्यानं डोंबिवली ते कोल्हापूर असा प्रवास करीत असत.  या सर्वात आपल्या कुटुंबासाठी सुवर्णाताई वेळ कधी काढतात, हा प्रश्न पडला असेल, तर नक्की थांबा.  कारण देवेंद्र आणि मानवेंद्र या दोन मुलासह त्यांना मनाली नावाची एक मुलगीही आहे.  त्यांच्याच परिचित असलेल्या या कुटुंबातील ही मनाली या सुवर्णाताईंच्या हाताखाली एवढी रुळली, की या राणेंच्या घरात लेक म्हणून मनाली राहू लागली.  मनालीच्या शिक्षणाची सर्व  जबाबदारी सुवर्णाताईंनी पार पाडली आहे. एमबीए झालेल्या या लेकीचा सुवर्णाताईंना खूप अभिमान आहे.  सुवर्णाताई आणि त्यांचे पती, आपल्याला दोन मुलं आणि एक मुलगी असल्याचे अभिमानानं सांगतात. 

सुवर्णाताईंच्या मोठ्या सुनेला, स्वातीला कॅन्सर असल्याचे निदान आले.  तेव्हा सुवर्णाताई मनानं खचल्या.  मात्र सुनेला या संकटातून बाहेर काढायचे, या निश्चयानं त्यांनी निदान झाल्यापासून तीन वर्ष डॉक्टरांकडे फे-या मारल्या.  सुनेच्या या आजारपणात दोन लहान नातवंडांची जबाबदारी त्यांच्यावर आली.  तीन वर्षानंतर मोठी सून स्वाती हिचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला.  या घटनेनं सुवर्णाताईंना हादरुन सोडलं होतं.  अशातून त्यांना त्यांच्या स्वरुपिणीच्या मैत्रिणींनी बाहेर काढलं.  यासर्वातून बाहेर पडत असतांना त्यांच्या लहान भावाचा ह्दयविकारानं मृत्यू झाला.  या लहान भावानं सुवर्णाताईंना खूप साथ दिलेली.  या भावाची पत्नी आणि मुलांना सांभळण्याची जबाबदारीही मग सुवर्णाताईंनी घेतली.  यातच मोठ्या जावेचा मृत्यू झाला.  मग या  दिराच्या मुलांनाही सुवर्णाताईंनी आपल्या मायेच्या पदराखाली घेतले.  आता ही सर्व मुलं उच्चशिक्षित असून सुवर्णाताईंना त्यांचा खूप अभिमान आहे.  सध्या आजी असलेल्या सुवर्णाताई धाकटा मुलगा मानवेंद्र याचा मुलाग अद्वैत याच्या कोडकौतुकात व्यस्त असातात. 

बरं या सर्वातून वेळ काढत सुवर्णाताई भजन शिकतात.  न चुकता दर गुरुवारी त्यांचा भजनाचा वर्ग असतो.  दत्त संप्रदायाच्या त्या अनुयायी आहेत.  अक्षदा भक्ती गित मंडळाच्या त्या अध्यक्षा आहेत.  त्यातून त्या डोहाळ जेवण, बारसे किंवा घरगुती कार्यक्रमात खेळांचा कार्यक्रम करतात.  पथनाट्य करतात.  एव्हरग्रीन सायकल प्रेमी ग्रुपच्या त्या अध्यक्षा आहेत.  त्या स्वतः साकयकल चालवतात.  रोज किमान चार किलोमिटर सायकल चालवण्याचा त्यांचा नेम आहे.  या सायकल क्लबच्या माध्यमातून त्यांनी अनेक घरकाम करणा-या महिलांना सायकल शिकवून सायकली दिल्याही आहेत.  या महिला आता रोज कामावर जातांना या सायकलींचा वापर करतात.  या त्यांच्या सायकल क्लबमध्ये वय वर्ष पाच ते सत्तरीच्या आजीही येतात.  सुवर्णाताई त्यांना सायकल चालवायला शिकवतात.  यातून पर्यावरणाचा समतोल साधता येतो, असं त्या नेहमी सांगतात.  याच माध्यामातून त्यांनी उंबर्ली टेकडीवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले आहे.  या वृक्षांची निगराणी करण्यासाठी सायकलवरुन महिन्यातून एकवेळ या भागात फेरी मारतात.  राखी पौर्णिमेला आपल्या सर्व मैत्रिणींकडून त्या राख्या तयार करुन घेतात, आणि एका पत्रासह या राख्या सीमेवरील जवानांना पाठवतात. 

कुठलंही काम हाती घेतलं तर ते पूर्णत्वास न्यायचं हा त्यांचा स्वभाव आहे.  मध्यंतरी त्यांचे पती हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये दाखल होते.  त्याच दिवसात मंडळात होणा-या एका पथनाट्यात त्या सहभागी होणार होत्या.  त्यांची प्रमुख भूमिका होती.  जवळपास महिनाभर त्यांनी आणि त्यांच्या मैत्रिणींना या पथनाट्यासाठी मेहनत घेतली होती.  त्या गेल्या नसत्या तर त्यांच्या गटाचे पथनाट्य रद्द झाले असते.  मग सुवर्णाताई अशाही परिस्थितीत पथनाट्य सादरीकरणासाठी गेल्या.  आपल्यामुळे आपल्या सहका-यांचे नुकसान होऊ नये,  ही त्यामागे त्यांची भूमिका होती.  हाच त्यांचा स्वभाव माझ्या मनाला भावतो.  कधीही, कुठेही भेटल्यावर मी कोण आहे, मी काय केलं, याची बढाई न मारता, त्या समोरच्या व्यक्तीची आपुलकीनं गप्पा मारतात.  याच स्वभावामुळे बहुधा मी त्यांना त्यांच्याबद्दल विचारायला गेले, तेव्हा त्यांचं पहिलं वाक्य होतं, मी काय केलंय, फार काही नाही.   त्यांच्या साध्या, सरळ स्वभावामुळे त्यांच्या खात्यात अगणित मैत्रिणी, नातेवाईक आणि आप्तेष्टांची जमापूंजी आहे. 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

Comments

  1. एका सुंदर बहु आगामी व्यक्तीमत्वाची ओळख करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
    अंजली कडेकर.

    ReplyDelete
  2. बहु आयामी

    ReplyDelete
  3. खूपच सुंदर व्यक्तिमत्व लेखन.

    ReplyDelete
  4. Khup mast lekh

    ReplyDelete
  5. निस्वार्थी अष्टपैलू व्यक्तिमत्व

    ReplyDelete
  6. खूप सुंदर 👌

    ReplyDelete
  7. खूप खूप छान लिहिले सई ताई तुम्ही, अगदी अशीच आहे आपली सखी सुवर्णा, अभिनंदन सखे🙏🙏🌹💐

    ReplyDelete
  8. तंतोतंत वर्णन.... अशीच आहे सुवर्णाताई आमची....❤️

    ReplyDelete
  9. खूप छान अष्टपैलू व्यक्तिमत्त्व.

    ReplyDelete
  10. खूप छान अगदी perfect वर्णन.

    ReplyDelete

Post a Comment