हरहुन्नरी सानिका

 

  



हरहुन्नरी सानिका

22 जानेवारी 2024 ही तारीख भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरानं लिहिली जाणार आहे.  याच दिवशी अयोध्यानगरीमधील भगवान श्रीरामांच्या मंदिराचे लोकार्पण होत आहे.  अयोध्येतील या मंदिराला बघण्यासाठी तमाम रामभक्तांची इच्छा आहे.  मात्र त्याआधी तशाच राममंदिराची झलक बघण्याचं भाग्य नुकतंच मिळालं.   डोंबिवलीतील जिमखाना मैदानावर आयोजित उत्सवमध्ये, डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवारतर्फे अयोध्येतील राममंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.  अयोध्येतील प्रभू श्रीरामांचे मंदिर कसे असेल, याची झलक या राममंदिराच्या प्रतिकृतीवरुन बघता आली.  अगदी हुबेहुब असलेल्या या मंदिराची ख्याती मुंबई-पुण्यातही झाली आहे.  या राम मंदिरात अगदी बारीक सारीक गोष्टींची काळजी घेण्यात आली आहे.  विशेषतः रात्री या मंदिराच्या सौदर्यात अधिक भर पडते, ती त्यावर असलेल्या आकर्षक रंगसंगतीमुळे.  रात्री रंगीबेरंगी प्रकाशझोत या मंदिरावर जेव्हा पडतात, तेव्हा या मंदिराचे सौदर्य अधिक खुलते.  दिवसेंदिवस या मंदिराला बघण्यासाठी गर्दी होत आहे.  हे मंदिर उभारणीमध्ये सानिका इंदप या तरुणीची मोठी भूमिका आहे.  सानिकाची भेट याच उत्सवदरम्यान झाली.  अतिशय शांत स्वभावाची ही मुलगी मनात घर करुन गेली.  सानिका कमर्शियल आर्टीस्ट आहे.  तिचे वडील उदय अरविंद इंदप हे या क्षेत्रातील तिचे आदर्श आहेत.  उदय इंदप यांचे या क्षेत्रात मानानं नाव घेतले जातं.  मंदिराच्या उभारणीसाठी सानिकानं वडिलांच्या सोबत दिवसरात्र  मेहनत घेतली आहे.  पण त्याचे श्रेय मात्र घेण्यासाठी ती कधीही पुढे जात नाही.  हाच तिचा नम्र, विनयशील स्वभाव मला अधिक भावला.



 

डोंबिवलीत उभारलेल्या प्रभू श्रीरामांच्या भव्य प्रतिकृतीमुळे एका कलाकार तरुणीची ओळख झाली.  ही तरुणी म्हणजे, सानिका उदय इंदप.  सानिका ही कमर्शियल, व्हीएफएक्स आर्टीस्ट  आहे.  तिचे वडील उदय अरविंद इंदप हे प्रसिद्ध कला दिग्दर्शक आहेत.  उदय इंदप हे या क्षेत्रातील दादा नाव, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.  उदय, हे  गेली 45 वर्ष या क्षेत्रात आहेत.  लग्नाचे भव्य सेट उभारण्यात त्यांचा हातखंडा आहे.  शिवाय सामाजिक बांधिकलकीही त्यांनी जोपासली आहे.  समाजातील अनेक प्रश्नांना आपल्या या कलेच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले आहे.  गणेश उत्सवाच्या दरम्यान उदय इंदप यांचे हे समाजभिमुख असे सेट विशेष कौतुकाचा विषय ठरले आहेत.  प्रसिद्ध कलादिग्दर्शक संजय दबाडे हे त्यांचे गुरु.  अनेक वर्ष फिल्म सिटीमध्ये त्यांच्यासोबत काम केल्यावर उदय इंदप यांनी या क्षेत्रात स्वतंत्र व्यवसाय सुरु केला.  त्यांच्या या सर्व प्रवासाला त्यांची मुलगी म्हणून सानिका जवळून बघत होती.  त्यामुळे त्यांच्या पावलावर ती पाऊल ठेवणार हे उघड होते.  पण सानिकाच्या स्वभावाचे विशेष म्हणजे, वडिलांच्या नावावर अवलंबून न रहाता स्वतः  मेहनत केली पाहिजे, याची जाण तिला आहे. म्हणूनच आज सानिकानं स्वतःच्या नावाच एक ब्रॅण्ड तयार केला आहे. 



वास्तविक कला दिग्दर्शक असणे हा बहुमान आहे.  पण या शब्दांमागे किती धावपळ आणि व्यस्तता आहे, ते प्रत्यक्ष याच व्यक्तिला माहित असते.  कामाच्या तासांचा हिशोब नसतो.  दिवस-रात्र असे बंधन नसते.  समोरच्या व्यक्तीच्या स्वप्नात असलेले दृष्य अपेक्षित असते, तेच प्रत्यक्षात साकारायचे असते.  त्यातून आर्थिक गणितही साधायचे असते.  आपल्या सोबत असलेल्या साथीदारांनाही जपायचे असते.  शिवाय सतत येणा-या तांत्रिक अडचणींचा गुंता सोडवायचा असतो.  अशावेळी दोनवेळचे जेवणही वेळेवर होत नाही.  ही सर्व मेहनत केल्यावर उभारलेल्या सेटकडे बघत ज्या प्रतिक्रीया येतात, त्याच या मंडळींसाठी मोठे बक्षिस असते.  सानिकाही आपल्या वडिलांची ही सर्व धावपळ लहानपणापासून बघत आहे.  कितीही थकवणारे क्षेत्र असले तरी त्यातील रंगांची विविधता आणि कलेचा अविष्कार यामुळे तिला भुरळ घातली.  मॉडेल शाळेतील शिक्षण आणि मॉडेल कॉलेजमधून पदवी घेतल्यावर तिनं या कला क्षेत्रात येण्यासाठी ग्राफिक डिझायनर आणि व्हिएफएक्सचा अभ्यासक्रम मान्यवर संस्थेतून पूर्ण केला.   व्हिएफएक्स चे शिक्षण घेत असतानाच सानिका केक करायला शिकली.  तिची आई, संगिता इंदप या अनेक खाद्यपदार्थ तयार करतात.  केकही उत्तमप्रकारे करतात.  आईच्या या कलेला सानिकानं अधिक उंचीवर नेलं.  केक बनवण्याचे कुठलेही प्रशिक्षण न घेता, ती केक तयार करु


लागली.  अंगी असलेल्या कलेचा तिला इथे उपयोग झाला.  तिचे केक चवीला जेवढे चांगले तेवढीच त्याच्यावरची सजावट मनाला भुरळ घालणारी असते.  सानिकानं शिक्षण चालू असतानाच कस्टमाईज केक करायला सुरुवात केली.  कुठलिही प्रसिद्धी न करता, तिच्या या केकची प्रसिद्धी झाली.  मग मित्रमंडळींचा आग्रह सुरु झाला, एवढे चांगले केक असतात तर ऑर्डर घ्यायला सुरुवात कर.  सानिकानं
माय हॅपिनेस नावानं आपल्या घरातूनच बेकरीचा व्यवसाय सुरु केला.  आता या केकच्या व्यवसायात तिचा हात एवढा बसला आहे की, ती 1 किलोपासून 15 किलोच्या केकच्या ऑर्डर घेते.  तिच्या केकचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनीही कौतुक केले आहे.  सगळ्यात मोठा पिझ्झा केकही सानिकानं तयार केला आहे.  एकीकडे सानिकानं कर्मशियल आर्टीस्ट आणि व्हिएफएक्स सारखे अभ्यासक्रम पूर्ण केले, आणि दुसरीकडे आपला स्वतंत्र व्यवसायही सुरु केला. 

आज सानिका कर्मशियल आर्टीस्ट म्हणून व्यस्त असली तरी ती आपल्या या बेकरीच्या व्यवसायाला वेळ देते.  तिची आई संगिता यासाठी तिला मदत करते.  लवकरच सानिका आपल्या ब्रॅण्डसह केकची स्वतंत्र बेकरी सुरु करणार आहे.  केक तयार करण्याचे कुठलेही प्रशिक्षण न घेतलेली सानिका अनेक तरुण तरुणींना केक बनवण्याचे प्रशिक्षण देते.  तिच्याकडून 100 हून अधिक तरुणांनी केक तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले असून आपला स्वतंत्र व्यवसाय सुरु केला आहे.  यासोबतच ज्यांना गरज आहे, त्यांना सानिका मोफत प्रशिक्षण देते, आणि व्यवसाय सुरु करण्यासाठी मदतही करते.  याशिवाय सानिका गिफ्टींग हॅम्पर तयार करते.  20 हून अधिक कंपन्यांसोबत तिनं टायप केलं आहे.  दिवाळी, दसरा, नववर्ष अशा प्रसंगी या कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांना भेटवस्तू द्यायच्या असतात.  अशावेळी सानिका त्या भेटवस्तू विशेष असतील, तसेच त्यांचे पॅकींगही आकर्षक असेल याची काळजी घेते.  सोबत ही मुलगी कंपनीमध्ये लोगो डिझाईनिंगचे काम करते.  स्टार्टअप सुरु केलेल्या व्यवसायिकांचा सानिकांने लोगो तयार केला आहे.  



सानिकाच्या मते हे सर्व साईड बिझनेस आहे.   वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत कला दिग्दर्शक होण्याचं स्वप्न ती पहात आहे.  डोंबिवलीमध्ये ना. रविंद्र चव्हाण यांच्या मार्फेत राममंदिराची प्रतिकृती उभारण्याची संधी मिळाली, हा आयुष्यातील मोठा क्षण असल्याचे ती मानते.  या राममंदिरासाठी सानिकानं महिनाभर मेहनत घेतली.  प्रोडक्शनची सर्व जबाबदारी तिनं सांभाळली.  आज या मंदिराला बघण्यासाठी मुंबई पुण्याहून रामभक्त येत आहेत, हे पाहून महिनाभर दिवसरात्र एक केल्याचे समाधान मिळाल्याचे ती सांगते. 

सानिकासाठी तिचे वडील आदर्श आहेत.  वडिलांनी आत्तापर्यंत स्वतःच्या नावाचा ब्रॅण्ड तयार करण्यासाठी जी मेहनत घेतली, ती तिच्यासाठी प्रेरणा आहे.  काम करतांना अनेक समस्या येतात, पण त्या पाठोपाठ त्यांची उत्तरेही येतात, हे सानिकांच्या वडिलांचे, उदय इंदप यांचे ब्रीदवाक्य आहे.  सानिकानंही आपल्या वडिलांचे हे ब्रीदवाक्य स्विकारले आहे.  त्याची सुरुवात तिच्या ग्राफीक डिझाईनिंगमधला अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावरच झाली होती.  2020 मध्ये जेव्हा कोरोनाचा उपद्रव सुरु झाला, तेव्हाच तिची पदवी पूर्ण झाली.  त्यावेळी घराबाहेर पडणेही बंद होते.  अशाचवेळी संधी असते, हे जाणून तिनं स्वतंत्र व्यवसाय सुरु केला.  काम कुठलेही असो, ते हातात आल्यावर त्याचे सोने झाले पाहिजे, एवढी मेहनत घ्यायची, हा वडिलांच्या विचारांचा वारसा सोबत घेत सानिका कला दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आली आहे.  राममंदिराची प्रतिकृती पहातांना आणि त्यासोबत नम्र स्वभावाची ही सानिका बघतांना सानिकाचे भविष्य उज्वल आहे, याची खात्री पटली. 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. Super blog 💯 🎉😍

    ReplyDelete
  2. Amazing ❤️

    ReplyDelete
  3. You are inspiration for so many youngsters.. keep going girl..

    ReplyDelete
  4. एखादी सुंदर कलाकृती बघितल्यावर त्याच्या मागच्या कलावंताच कौतुक करणं किती आवश्यक आहे ते लेख वाचताना कळतं!! ललिता छेडा

    ReplyDelete
  5. या निमित्ताने आम्हाला सानिकाची ओळख झाली. अप्रतिम कलाकृती आहे. कौतुकास्पद काम.

    ReplyDelete
  6. You have worked hard to get to this point. You are the most creative and talented person i ever know.I always knew you could do it, and I'm incredibly proud of you. You are the most amazing friend I could ask for.

    ReplyDelete
  7. Your dedication and enthusiasm are totally inspiring wishing u many more success on ur way keep growing sanika.proud of u 🫶🏻♥️ amazing work done ✅

    ReplyDelete
  8. कलाकाराला त्याच्या कामाचे व कार्याचे कौतुक हेच त्याच्यासाठी खूप काही असते. तेच आपण शब्दरूपाने मांडले आहे.

    ReplyDelete
  9. You never fail to impress everyone so proud of you♥️

    ReplyDelete
  10. खूपच छान सानिका, श्री प्रभू रामांमुळे तुझी कला आम्हाला कळली, आणि या मंदिराची कला दिग्दर्शक आमची पुतणी आहे याचा आम्हा इंदप परिवाराला अभिमान वाटतो, खूपच सुंदर कार्य तुमच्या कडून घडून आले आहे , खूप मोठी हो, इंदप हे नाव खूप मोठे कर , तुला खूप खूप शुभेच्छा.

    ReplyDelete
  11. We are proud of you Sanika. Keep going. Best wishes. - Nisha K

    ReplyDelete
  12. लेख खुप छान आहे2👌👌

    ReplyDelete

Post a Comment